सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतलीय. मात्र राज्यात 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
27 ते 30 ऑगस्टदरम्यान काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
नैऋत्य मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या ( परतीकडे) टप्प्यात प्रवेश करेल, जे सामान्य तारखेच्या सुमारे पंधरवडा आधी असेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी ही माहिती दिली. नैऋत्य मान्सून परतीची साधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. तथापि, नैऋत्य मान्सूनची वास्तविक परतीचा प्रवास हा सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर होतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
IMD ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजामध्ये म्हटले आहे की, वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून 1 सप्टेंबरपासून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे