सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:04 IST)

तिघी मैत्रिणींच राज ठाकरे यांनी केलं कौतुक

कोल्हापूरात हॉटेल विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने तिघींनी चक्क पाणीपुरी आणि शिवपुरी गाडी सुरू केली आहे. ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता असं त्या महाविद्यालयीन युवतींची नावे आहेत. आठवड्यापूर्वी या तिघी मैत्रिणींनी अंबाई टॅंकसमोर पाणीपुरी, शेवपुरीची गाडी चालू केली. ज्या वयामध्ये इतर मुलं आई-पप्पांकडून पॉकेटमनी घेऊन मज्जा मारतात, त्याच वयात या तिघी मैत्रिणींनी पाणीपुरी, शेवपुरीची गाडी टाकली आहे. त्यांची ही धडपड पाहून मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील भारावले आहेत.
 
चक्क राज ठाकरेंनी ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता यांचे कौतुक केले आहे. शिवाय 'मनसे वृतांत अधिकृत' या आपल्या फेसबुक पेजवर ऐश्वर्या, श्रद्धा व गीताची यशोगाथा शेअर करून तरुणींना आणखी बळ दिलं आहे.