testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राज यांचा पुन्हा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

raj cartoon
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधतांना ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.
बाजूला यूपी पालिका निवडणुकीत मतदार याद्यांत आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची बातमी देण्यात आली आहे. या बातमीचा संदर्भ हा व्यंगचित्रासाठी देण्यात आला आहे. मतदारांची मतदान यांद्यामधून नावे उडवणे, तसेच ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली देताना राज्याचे निवडणूक आयुक्त एस के अग्रवाल यांच्या संतापाचा भडका पत्रकार परिषदेत उडाल्याचा, संदर्भ बातमीत देण्यात आलेला आहे.


यावर अधिक वाचा :