मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (17:18 IST)

राम कदम यांची पुन्हा एक चूक, अभिनेत्री सोनालीच्या निधनाचं केलं ट्विट

काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट त्यांनी केलं.
 
‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.हे ट्विट चुकीचं असल्याचं लक्षात येताच ते डिलीट करण्यात आलं पण, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र सध्या ते बरंच व्हायरल झालं असून, आता त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. 
 
विशेष म्हणजे आपली ही चूक सावरुन नेण्यासाठी राम कदम यांनी आणखी एक ट्विट केलं असून, गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पाहायला मिळत आहेत, मी त्यांच्या हितासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असं लिहित त्यांनी आपल्या चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला.