शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (10:18 IST)

नारळाची कुस्ती जिंकून राणे हिंद केसरीची बरोबरी करू शकत नाही-शंभूराज देसाई

सिंधुदुर्गजिल्हा बँक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणे हे बत्ताशावरचे पहिलवान आहेत. त्यामुळं नारळावरची कुस्ती जिंकून ते हिंदकेसरीची बरोबरी करू शकत नाही, असं शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुका मर्यादीत मतदारांच्या असतात. भविष्यात जनमताचा कौल घेण्यासाठी पुढे या, तेव्हा शिवसेनेची शक्ती कळेल अशा शब्दात देसाई यांनी राणेंना आव्हान दिलं.
दरम्यान, आगामी विधानसभेत महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असंही राणे म्हणाले. आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे, लगानची टीम नको असंही त्यांनी म्हटलं होतं. तर पोस्टर लावण्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली.