मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:19 IST)

समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं’; शरद पवारांना राष्ट्रवादीकडून खास शुभेच्छा

sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा एका आजारावर मात केली आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याबाबत खुद्द पवार यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली होती. तसंच आपली प्रकृती उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर  आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहितीही पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे. शरद पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवर एक खास व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं’ असं एक गीत तयार करण्यात आलं असून, त्यात पवार यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशापासून ते विविध क्षेत्रातील छटा दाखवण्यात आल्या आहेत.
 
अडीच मिनिटाच्या या व्हीडिओमध्ये शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील नेते, दिग्गज व्यक्तींसोबत असलेले पवारांचे फोटो आणि व्हीडिओ यात वापरण्यात आले आहेत. त्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार, माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येषठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, केंद्रात संरक्षणमंत्री, कृषी मंत्रीपदाची सांभाळलेली जबाबदारी, बीसीआयचे अध्यक्षपद अशा अनेक जबाबदाऱ्या पेलतानाचे पवार तुम्हाला या व्हीडिओत पाहायला मिळतात. ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं… हर अर्जुन का सारथी, ये इसकी पहचान हैं’ असं हे गीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सामान्य माणसांनाही खूप भावलं आहे.