1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसे राष्ट्रवादी सोबत तर शरद पवार निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ने रणनीती आखायला सुरुवात केली असून आता २००९च्या लोकसभा निवडणुकांनंतर ‘मी लोकसभा पुन्हा लढवणार नाही’ असा निर्णय जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारी प्रचाराच्या रणधुमाळीत दिसण्याची दाट शक्यता आहे. 

दोन दिवसांपासून पक्ष स्तरावर  यावर चर्चा सुरू होती. त्यानंतर  झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल आहे. शरद पवार निवडणुकीला उभे राहणार याबाबतची अधिकृत घोषणा काही दिवासांमध्ये होणार आहे या बद्दल  माहिती प्रफुल्ल पटेल यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अखेर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रंह आम्ही त्यांच्याकडे केला. 

आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. सोबतच मनसेबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक असून ते आम्हाला भाजपविरोधी मदत करतील, अशी आशा आहे’, असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी समाविष्ट करून घेण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत होतं. त्यामुळे आता फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी असून मनसे जर राष्ट्रवादी सोबत गेली     तर एक मोठा जनसमुदाय राष्ट्रवादीला मिळणार असून राज ठाकरे यांच्या सारखे लोकांना भिडणारे नेते देखील त्यांच्या सोबत जोडले जाणार आहेत.