बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

परळीत शिवसेना उमदेवार देणार

मुंडे बंधू-बघिनी मुले परळी नेहमीच चर्चेत असते. मात्र यामध्ये गोपीनाथ मुंडे असल्याने शिवसेनेने कधीच उमेदवार दिला नाही. मात्र आता पक्ष भूमिका बदलत आहेत. नेहमीच राज्याचं लक्ष लागलेले असते. परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे.

यामध्ये देगलूरचे  शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे  यांनी माहिती दिली आहे ते सांगतात की निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 'मातोश्री'वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे.  त्यामुळे आता शिवसेनेच्या  घोषणेनंतर भाजपा  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध  राष्ट्रवादी कोन्ग्रेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत परळी विधानसभा मतदार संघात तिरंगी होणार असे  स्पष्ट झाले आहेत.

परळी हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आणि नंतर महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे.तर पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू  धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते.