testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनेला धक्का, मनसेचे चार नगरसेवक परतणार

मुंबई: मनसेची साथ सोडून शिवनसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैंकी चार नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेत गेले होते.

मिळालेल्या वृत्तानुसार अश्विनी मतेकर (वॉर्ड 156) आणि दिलीप लांडे (वॉर्ड 163) यांच्याशिवाय अन्य चार नगरसेवकांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या चार नगरसेवकांच्या घरवापसीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र ते पुन्हा पक्षात परतल्यास आनंदच आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली आहे.


यावर अधिक वाचा :