बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजपने सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जावे: उद्वव

नांदेड- भाजपने महाराष्ट्रातील सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवावे, त्यांना शिवसेनेची ताकद दाखवू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिला.
 
भाजपने महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर पडून पुन्हा एकदा निवडणुकांना तोंड देण्याचे माझे आव्हान त्यांनी स्वीकारावे. आमची ताकद त्यांना दाखवू. मोदी लाट असतानाही शिवसेनेच्या नावावर भाजपने मते मिळविली आहेत, असा आरोपीही त्यांनी केला.
 
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ठाकरे यांची प्रचारसभा नांदेडमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर ताशेरे ओढळे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल करण्याच्या सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढविला.