testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनची भाजपावर टीका : आपच्या २० आमदारांना बचावाची संधी का नाही ?

shivsena bjp
Last Modified मंगळवार, 23 जानेवारी 2018 (08:39 IST)

शिवसेनेन पुन्हा एकदा भाजपा वर टीका केली आहे. जर तुमचे आमदार असते तर काय केले असते ? २० निलंबित आमदारांना त्यांचे म्हणणे मांडायची संधी का दिली नाही. असा सवाल शिवसेनेने केला आहे,


पण २० आमदारांना घरी बसवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. असे शिवसेनेने म्हटले आहे.

सामनातून भाजपावर टीका
केजरीवाल यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री असता तर नायब राज्यपाल आज जसे वागतात तसे वागले असते काय व बचावाची संधी न देता सत्ताधारी पक्षाचे २० आमदार घरी पाठविण्याची हिंमत निवडणूक आयोगाने दाखवली असती काय? केजरीवाल यांचे अधःपतन झालेच आहे व ते आता ‘आपला’ माणूस राहिलेले नाहीत, पण २० आमदारांना घरी बसवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
‘आपला
मानूस’ नावाचा एक मराठी चित्रपट लवकरच
प्रदर्शित होत आहे, पण साधारण तीनेक वर्षांपूर्वी ‘आपला’ माणूस म्हणून जनतेने अरविंद केजरीवाल यांना डोक्यावर घेतले होते. त्या आपल्या माणसाचे पायही शेवटी मातीचेच निघाले व त्या आपल्या माणसालाच आता रोज आरोपीच्या पिंजऱयात उभे राहावे लागत आहे. केजरीवाल यांची शोकांतिका झाली आणि ही शोकांतिका भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध उसळलेल्या जनआंदोलनाची आहे. ‘आप’च्या २० आमदारांना निवडणूक आयोगाने एका झटक्यात अपात्र ठरवले आहे. राष्ट्रपतींनीही रविवारी निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर मोहोर उमटविली आहे. इतक्या होलसेल भावात लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याची ही पहिलीच घटना असेल व तो विक्रम केजरीवाल यांच्या नावे जमा झाला आहे. ‘आप’च्या २० आमदारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचे पद घेतले व त्यामुळे या आमदारांना घरी जावे लागणार आहे. या आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती झाल्याने वाद निर्माण झाला. भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ (१) नुसार सरकारी वेतन आणि भत्ता मिळेल असे इतर कोणतेही पद स्वीकारणे बेकायदेशीर आहे.यावर अधिक वाचा :

कॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...

national news
अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...

national news
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...

national news
धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...

"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

national news
मुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

national news
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...

व्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन

national news
सर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...

अॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार

national news
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...

जिओची मान्सून हंगामा ऑफर

national news
जिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...

व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु

national news
व्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...

मोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट

national news
विभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...