बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (15:21 IST)

देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, पेट्रोल किंमितीत भयानक वाढ

मागील वर्षी थोडी थोडी करत या वर्षापर्यंत पेट्रोलची किंमत भरमसाठ वाढली आहे. यामुळे नागरिक वैतागले आहे. आज जेव्हा मुंबईत पेट्रोल भरायला नागरिक गेले तर त्यांचे डोळे पाढरे झाले आहेत. पेट्रोल ने पहिल्यांदा इतकी वाढ झाली असून तब्बल ८० रुपये लिटर पेट्रोल झाले आहे.मुंबईतील पेट्रोलचे आजचे दर 80.10 रुपये प्रती लिटर आहेत. पेट्रोल 80 रुपयांच्या वर जाण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहे. थोडी थोडी करत पेट्रोल इतके वाढले आहे. मुंबईत पेट्रोल 80 रुपये 10 पैसे प्रती लिटर, तर डिझेल 67 रुपये 10 पैसे प्रती लिटर आहे. पूर्ण देशात मुंबईत सर्वात महाग पेट्रोल आहे. 
 
दिल्लीत पेट्रोलचे दर 72 रुपये 23 पैसे प्रती लिटर, तर डिझेल 63 रुपये 01 पैसे प्रती लिटर आहे. तर लखनौमध्ये पेट्रोल 73 रुपये 94 पैसे, तर डिझेल 63 रुपये 46 पैसे प्रती लिटर आहे.अहमदाबादमध्ये पेट्रोल 71 रुपये 83 पैसे, तर डिझेल 67 रुपये 83 पैसे प्रती लिटर आहे. त्यामुळे आता पेट्रोल कमी होऊन किती होणार हा प्रश्नच आहे.