शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:21 IST)

हा घाट तर शिवसेनेने घातला आहे : नारायण राणे

रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार ग्रीन रिफायनरीला  प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातल्याची टीका नारायण राणेंनी केली. शिवाय, कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचाही आरोप राणेंनी केला. कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.


“आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.”, असे राणे म्हणाले.