शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (11:16 IST)

...तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते. कारण त्यावेळी त्यांच्या तोडीचा दुसरा अन्य नेता कोणीही नव्हता, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुार शिंदे यांनी सांगितले.
 
शरद पवार हे आपले गुरू तर आहेतच शिवाय ते अतिशय चलाख नेते आहेत. त्यांना भविष्यातील सर्व काही उमजते. असा गुरू मला लाभला हे माझे भाग्य समजतो, असेही शिंदे म्हणाले. 
 
शिंदे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यापूर्वी दोनवेळा भाजपचे सरकार सत्तेवर आले; परंतु ज्या पध्दतीने त्यांनी काम केले, ते काम जनतेला रुचले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्यांना पाउतार व्हावे लागले. त्यावेळी शायनिंग इंडियाचा जोरात प्रचार झाला होता. आताही त्याप्राणेच स्टॅन्डअप आणि स्टार्टअप इंडियाचा प्रचार सुरू आहे. केवळ या सरकारकडून घोषणाबाजी सुरू आहे अंलबजावणी मात्र शून्य आहे. त्यामुळळे हे सरकार आता सीटडाउन झाले असून लवकरच ते स्लीपडाउन होईल, अशी स्थिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण जवळून पाहिले आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे पक्षाचे प्रभारी असताना त्यांची माझी नेहमीच भेट व्हायची. मात्र, ते चहा विकत होते, असे कधी ऐकणत आले नाही. ते आताच चहावाले कसे काय झाले? आता त्यांच्या लोकांसाठी तरी त्यांनी काही करून दाखवावे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.