शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:45 IST)

तर आम्ही पावणेपाच नाव ईडी आणि सीबीआयला देणार : रवी राणा

ravi rana
शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन ईडीसंबंधित गौप्यस्फोट करणार आहेत. या दरम्यान अनिल देशमुखांच्या कोठडीत भाजपचे साडेतीन लोकं असतील आणि अनिल देशमुख जेल बाहेर असतील असे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. हे साडेतीन लोकं कोण असतील? याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. पण त्यापूर्वी आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की, ‘जर संजय राऊत साडेतीन नावाचा गौप्यस्फोट करणार, तर आम्ही पावणेपाच नाव ईडी आणि सीबीआयला देणार आहे.’
 
‘संजय राऊत साडेतीन जणांना अनिल देशमुखांच्या कोठडीत पाठवण्याबाबत बोलतात. तसेच राऊत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईपासून नागपूरमध्ये जाऊ देणार नाही सांगतात. मुंबईमध्ये बसून देवेंद्र फडवणीसांना दम देत असतात, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्याप्रमाणे साडेतीन जण संजय राऊत सांगतात, तर आमच्याकडे पावणेपाच जणांनी नावे आहेत. ते आम्ही एका बंद लिफाफ्यामध्ये ईडी आणि सीबीआयला देणार आहोत,’ असे आमदार रवी राणा म्हणाले.