सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महिलेची काढली किडनी, गंभीर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

मोठे गंभीर प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पोटदुखीसाठी उपचार घेताना डॉक्टरांनी संगणमताने किडनी काढून घेतल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्याच्या कवठे गावातील सुनिता इमडे या महिलेने केला असून, याबाबत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या मात्र कोणीही दखल घेतली नाही. मग महिलेने सनराइज हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन यांच्याकडे धाव घेतली. या संस्थेमार्फत थेट पंतप्रधान कार्यालयाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे सोलापुरातील अश्विनी रुग्णालयातील रुग्णसुविधावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. त्यामुळे मोठा प्रकार समोर येण्याची चिन्हे असून यात काय घडले हे तपासातून बाहेर येणार आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात कवठे गावात राहणाऱ्या सुनिता इमडे ही जुलै 2016 ला आईच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे गेली होती. पोटात दुखत असल्याने सुनिता यांनी रुग्णालयात तपासणी केली. त्यावेळी, डॉक्टरांनी सुनिताला ऑपरेशनचा सल्ला दिला होता . तर विशेष म्हणजे सरकारी योजना असलेल्या राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजने मधून हे ऑपरेशन  करण्याची हमीही देण्यात आली. त्यानंतर, सुनिताच्या आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या आईला, भावाला सुनीताची उजव्या बाजूची किडनी ही पूर्ण निकामी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच लवकरात लवकरच किडनी काढण्याचेही सूचवले. सुनिताची आई आणि भाऊ हे दोघेही अशिक्षित असल्याने त्यांच्या सह्या अंगठ्या घेऊन आपली किडनी काढून घेतल्याचा आरोप पीडित महिला सुनिता इमडे यांनी केला आहे.