शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (11:16 IST)

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी रेल्वे कडून विशेष गाड्या

गेल्या दीड वर्षा पासून कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे पंढरपुरातील कार्तिकी यात्रा झाली नव्हती. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यांमुळे कार्तिकी एकादशी यात्रा होणार असून रेल्वे कडून विशेष गाड्या चालविणार आहे. सध्या राज्यात एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. खाजगी गाड्या जास्त दर आकारत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या संपाला बघता रेल्वे विभागाने कार्तिकी यात्रेत भाग घेणाऱ्या प्रवाशांसाठी  होणाऱ्या अतिरिक्त गर्दीला टाळण्यासाठी प्रवाशांच्या सोयीला लक्षात घेत लातूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि लातूर-मिरज अशा काही अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. प्रवाशांना कोरोना संबंधित सर्व नियमांचे, एसओपी , बोर्डिंग प्रवास, गंतव्यस्थानी पालन करावे.असे सांगण्यात आले आहे.
 
लातूर पंढरपूर ही 01281 विशेष गाडी 12 नोव्हेंबर,15 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, आणि 17 नोव्हेंबर रोजी लातूर येथून सकाळी 7:45 वाजता निघून 11:30 वाजता पंढरपूर पोहोचेल.
पंढरपूर ते लातूर  01282 ही गाडी 12 नोव्हेंबर,15 नोव्हेंबर,16 आणि 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि संध्याकाळी साढे पाचच्या सुमारास लातूर येथे पोहोचेल. 
ही गाडी हरंगुळ,औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, आणि मोडलिंब या स्थानकावर थांबा घेणार. ही विशेष गाडी 6 स्लीपर आणि 6 सेंकड क्लास सीटिंग असणार .ही विशेष गाडी 8 फेऱ्या घेणार. 
 
पंढरपूर ते मिरज विशेष गाडी -
ही पंढरपूर ते मिरज विशेष 01283 अनारक्षित गाडी 13 ,15 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:10 वाजता पंढरपूर येथून निघणार आणि दुपारी 13 :10 ला मिरज येथे पोहोचेल. 
 
मिरज वरून सुटणारी 01284 अनारक्षित विशेष गाडी 13 ,15 ,16 नोव्हेंबर रोजी 13 :35 वाजता मिरज वरून सुटेल आणि दुपारी 15 :45 वाजता पंढरपूर पोहोचेल. ही विशेष गाडी सांगोला, जत रोड ,ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे, आणि अरग या स्थानकांवर थांबा घेईल. 
ही गाडी 6 द्वितीय श्रेणी आसनी आणि 6 शयनयान  ची असेल.ही गाडी 6 फेऱ्या घेणार.  
 
लातूर -मिरज विशेष गाडी -
लातूर वरून सुटणारी 01285 अनारक्षित विशेष गाडी 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी 09:35 वाजता सुटून मिरजला संध्याकाळी 17:00 वाजता पोहोचेल. तसेच मिरज वरून 01286 ही गाडी 12 ते 17 नोव्हेंबर पर्यंत दररोज मिरज वरून सुटून दुसऱ्या दिवशी 03 :30 वाजता लातूर पोहोचणार. ही गाडी हरंगुळ, औसा, येडशी , उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे , अरग या ठिकाणी थांबा घेणार. ही गाडी 14 आसनी  द्वितीय श्रेणी असणार .ही विशेष गाडी 12 फेऱ्या करणार.