गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (19:23 IST)

नारायण राणेंचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर हल्ला बोल

uddhav narayan rane
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई शिवतीर्थावरील झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्ला बोल केला. ते म्हणाले यंदाच्या ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा झाला नसून शिमगा साजरा करण्यात आला. या मेळाव्यात शुभेच्छा नाही तर शिव्या देण्याचे काम केले गेले. ज्या प्रमाणे शिमग्याला शिव्या दिल्या जातात.त्याच प्रमाणे या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी शिव्या दिल्या. आम्ही आमच्या कोणत्याही नेत्यांबाबत कोणाकडून अपशब्द बोललेलं सहन करणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असण्याचे  संकेत दिले.तसेच उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केले हे तरी सांगावे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत असताना लोक बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचा उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात वैचारिक बौद्धिकतेचं सोनं नसल्याचे दिसून आलं.   
 
Edited By- Priya Dixit