बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2024 (08:55 IST)

ठाणे एसटी विभाग सज्ज, नियमित गाड्यांव्यतिरिक्त २५ गाड्यांचे नियोजन

st buses
ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी व फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे एसटी विभाग सज्ज झाला आहे. ११ एप्रिल पासून १५ जूनपर्यंत उन्हाळी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालवधीत ठाणे १ आणि ठाणे २ या आगारसह कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा या सात एसटी अगगारातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त २५ गाड्यांवर नियोजन करण्यात आले आहे. तसेच या सोडण्यात येणाऱ्या जादा बसेसमध्ये देखील शासनाने लागू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ देखील प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.
 
 ठाणे १ आणि ठाणे २ या आगारसह कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा या सात एसटी अगगारातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त २५ गाड्यांवर नियोजन केले आहे. नियमित गाड्यांमध्ये शासनाच्या असलेल्या सवलती उन्हाळी जादा बसेसमध्ये देखील लागू राहणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली.
 
एक तासानी सातारा, अर्धा तासांनी शिवनेरी
ठाण्यातील वंदना बस डेपो येथून सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दर एक तासांनी सातारा करिता बसेस सोडणार आहे. त्याचबरोबर, ठाणे ते स्वारगेट या मार्गावरदेखील उपरोक्त वेळेत दर अर्धा तासांनी ई-शिवनेरी बस सोडण्यात येणार आहे.
 
उन्हाळी जादा बसेसचे नियोजन ठाणे एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या बसेसचे संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आले असून शासनाकडून देण्यात येणाऱ्या ७५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलती देण्यात येणार आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor