सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (16:08 IST)

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला : राऊत

वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यावर  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही याबाबत रोखठोक मत मांडले आहे.
 
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मात्र, भाजप नेत्यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका करताना, आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवू देणार नाही, असे म्हटलंय. त्यानंतर, संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.