1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 मार्च 2020 (16:40 IST)

कोरोनाची भीती, मदतीला नकार, रुग्णाचा गेला जीव

maharashtra news
नागपुरात जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या प्रमोद बुट्टे यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतर प्रमोद तडफडत होता. त्यांची ही अवस्था पाहून पत्नीने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. पण रुग्णालयात घेऊन गेलो, तर कोरोना होईल या भीतीने शेजारी प्रमोद याला रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हते. शेवटी प्रमोद यांच्या पत्नीने नातेवाईकांना फोन केला. ते येईपर्यंत दोन ते अडीच तास गेले आणि उशिर झाला.
 
प्रमोद बुट्टे यांना रुग्णालयात दाखल न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाची गंभीर दखल  पोलिसांनी घेतली आहे. नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून रुग्णांना लोकांनी त्वरीत मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.