रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (21:10 IST)

सरकारनं स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही; जयंत पाटलांचा आरोप

Jayant Patil
बारसू रिफायनरी वादावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकांनी विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं होतं. मात्र ते झालं नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
 
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकांची समजूत घालणं आणि लोकांना विश्वासात घेणं हे विकास मार्गाचं पहिलं पाऊल आहे.ते टाळून सरकार रेटारेटी करत असेल तर प्रश्न तयार होतात. यातून स्थानिक लोकांना प्रकल्प आपल्या विरोधात आहे असं वाटतं. एवढ तारतम्य सरकारनं ठेवण आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
 


Edited By-Ratnadeep Ranshoor