शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (10:09 IST)

कपडे धुण्यासाठी गेलेल्‍या तिघांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ओझे कादवा नदीवर रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्‍या अनिता यादव वाघमारे (२९) तसेच त्‍यांचा मुलगा ओंकार यादव वाघमारे (१४) यांचा बुडून मृत्यू झाला. प्राजक्ता बाळू गांगोडे (वय १५) हिचाही बुडून मृत्यू झाला.
 
या घटनेत अधिक माहिती अशी की, ओझे कादवा नदीवर अनिता वाघमारे या कपडे धुण्यासाठी गेल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांच्यासोबत मुलगा ओंकार वाघमारे तसेच प्राजक्‍ता हे दोघेही गेले होते. यावेळी हे तिघेही नदीत बुडाले. अनिता यादव वाघमारे या उमराळे खुर्द येथील अंगणवाडीच्या मदतनीस आहेत.