1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (15:52 IST)

आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही, बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

There is no disagreement
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचा खुलासा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद असेल, तर चर्चेतून मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे मंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे  ते म्हणाले. काल झालेल्या विसंवादाच्या घटनेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज खुलासा केला आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अन्लॉकचे पाच टप्पे जाहीर करण्याचा निर्णय झाल्याचे सांगताना ‘तत्त्वत:’ हा शब्द विसरले आणि वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्र अन्लॉक होत असल्याचे ब्रेकिंग वृत्त झळकवणे सुरू केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने खुलासा करीत सांगितले आले.