शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (09:33 IST)

त्या’ आरटीओ कार्यालयासमोर चक्क ‘जागरण गोंधळ’ घातला

सध्या अनेक संघटना त्यांच्याप्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी संबंधित अधिकारी अथवा कार्यालयासमोर आंदोलन करतात.मात्र श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात रिक्त असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी चालक-मालक प्रतिनिधी संघटनेच्यावतीने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालण्यात आला.चालक-मालक प्रतिनिधी संघटनेने येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर चक्री आंदोलन करण्यात आले.
 
वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र चाचणी त्वरीत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, रिक्तपदी मोटारवाहन निरीक्षकांची नियुक्ती करावी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरीक्षकांची अहमदनगर कार्यालयात केलेली प्रतिनियुक्ती त्वरीत रद्द करावी, मोटार वाहन निरीक्षकांच्या सर्व रिक्त पदांवर नियुक्ती होईपर्यंत चेकपोस्टवरील नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

तसेच झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी जय मल्हार जागरण गोंधळ मंडळाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रमही आंदोलनस्थळी करण्यात आला.