शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (09:06 IST)

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला वाचवण्यासाठी वन्य जीव प्रेमींनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. मोहिमेला केवळ भारतच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यातून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. वाघीण नरभक्षक असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या जंगलातील 'अवनी' (टी -१) वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वनखात्याला दिले, मग वन विभागाने हैदराबाद चा शुटर नवाब शाफात आली खान याला बोलावले आहे. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र अजूनपर्यंत 'अवनी' वाघिणीचा सापडली नाही. मात्र आता  नागपूरच्या वन्य जीव प्रेमींनी अखेरचा प्रयत्न म्हणून या अवनी वाघिणीला जीवदान मिळावे व यासाठी ऑनलाईन  मोहीम सुरु केलीय.
 
नागपूरच्या डॉक्टर जेरील बनाईत व मुंबईच्या डॉक्टर सरिता सुब्रामनीयम यांनी पुढाकार घेतला असून, सोशल साईट इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर वर #save avni #Let Avni Live या नावाने जगभरातील वन्य जीव प्रेमींचे लक्ष वेधले आहे. चेंज डॉट org वर ऑनलाईन पिटीशन दाखल करून अवनीला वाचवण्याचे आवाहन केले आहे. या पिटीशन वर जगभरातील ६० हजारांपेक्षा नेटकऱ्यांनी अवनीला वाचवण्याच्या बाजूने आपला कौल दिला. वाघिणीला ठार मारू नये यासाठी डॉक्टर जेरील बानाईत यांनीच न्यायालयात लढा दिला होता. अवनीला मारण्यापेक्षा बेशुद्ध करून तिचे स्थलांतर करण्याची मागणी या वन्यजीव प्रेमींनी केली आहे. तर तिच्या घरात तिला कसे मारू शकतो वाघीण आहे म्हणून जंगल आहे, एकदा का तिला मारले की त्या जंगलाचा उपयोग खाणी खोदायला होणार असे चित्र सुद्धा आहे.