मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:30 IST)

कोरोना काळातील बेरोजगारीमुळे तरुणाने आयुष्य संपवल

कोरोना काळात जगभरातील विविध कंपन्यांना फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. शिवाय जे नोकरीच्या शोधात होते, त्यांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसलं आहे. दिवसेंदिवस देशातील बेरोजगारी वाढू लागली आहे.
 
दरम्यान या बेरोजगारीमुळे नागपूरमधील एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बेरोजगारी आणि वाढत्या वयामुळे हा तरुण नैराश्यात गेला होता. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला बेरोजगारी आणि वाढत्या वयामुळे हा तरुण नैराश्यात  गेला होता. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला.
 
पुण्यातील खडकवासला धरणात उडी मारुन त्याने आत्महत्या केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खडकवासला धरणाच्या दरवाज्यातून या इसमाचा मृतदेह बाहेर काढला आहे. संजय नाईक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.