1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (11:07 IST)

वारांगना आणि तृतीयपंथीयांचा रॅम्पवॉक…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये प्रवारा मेडीकल ट्रस्टच्या वतीने वारंगणांसाठी खास रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनानिमित्त जगभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक महिलांचा सत्कार होतो. मात्र आयुष्याच्या एका वळणावर पाय घसरलेली ती नकळत देहविक्रीच्या दलदलात सापडते तेव्हा तिच्या गौरवाची बाब तर सोडाच मात्र तिचा कायम तिरस्कार केला जातो अशा महिला वारांगणांचा नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रॅम्प वॉक संपन्न झाला.
 
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, धनवंतरी इंस्टीट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग, दिशा महिला संस्था, मनमिलन सामाजिक संस्था आणि एनजीओच्या पुढाकारातून वारांगना महिला आणि तृतीयपंथासाठी स्त्री म्हणून हवा सन्मान या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅम्पवॉक कार्यक्रमात आठ वारांगना आणि आठ तृतीयपंथीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उपस्थितांची दाद मिळवली. वारांगनाने सुरु केलेला तिचा व्यवसाय, निवड ही ती ची जबाबदारी असली तरीही स्त्री म्हणून तिचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हा संदेश सर्वदूर पोचण्यासाठी या रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते.