बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (09:42 IST)

राज्यात पाण्यासाठी महाश्रमदान

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात येत  आहे. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून एक लाखाहून अधिक जण खेड्यांकडे श्रमदानासाठी जाणार आहेत.या श्रमदानात राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड आणि उद्योग जगतातील मोठी मंडळीही मधील कलाकारही सहभागी होणार आहेत.  सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले आहेत. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला आहे. 

लातूरमध्ये आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्टी कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानात सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले आहेत. तर  सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अमेय वाघ, अलोक राजवाडे-पर्ण पेठे हे कलाकारही विविध ठिकाणी महाश्रमदान करत आहेत.