मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:10 IST)

बायकोच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

बायको कपडे धुवायला लावते, घरकाम करून घेते म्हणून पुण्यातल्या एकाने आत्महत्या केल्याची बातमी आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना एक मूलही आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पत्नी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुवायला लावून घरातील कामे करून घ्यायची, म्हणून या तरुणाने कंटाळून आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.