1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (17:15 IST)

कविता करकरे यांचे मुंबईत निधन

मुंबईवरील 26/11 या सगळ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. करकरे यांनी शनिवारी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्‍यात वाले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. नंतर त्या कोमात केल्या. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कविता करकरे राहत्या घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. नंतर त्यानायं रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात आणले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. कविता करकरे यांना त्यांची ह्रदयक्रिया सुरळीत सुरु व्हावी, यासाठी त्यांच्यावर उपचार केले गेले. मात्र, त्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे सकाळी डॉक्टरांनी सांगितले होते. करकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.