1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , सोमवार, 2 जून 2014 (10:39 IST)

बारावी परीक्षेचा आज निकाल

महाराष्‍ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवार) दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल सुरुवातीला जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर 10 जूनपासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. गुणपडताळणीसाठी 20 जूनपर्यंतची मुदत असेल. श्रेणी वा गुणसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2014 व मार्च 2015 अशा दोन संधी मिळतील. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवता येईल. निकालापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन करता येईल.

एसएमएसवरूनही निकाल मिळवता येणार आहे. बीएसएनएलच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये MHHSC<seat no> असे टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवल्यास निकालाचा एसएमएस प्राप्त करू शकता. 

निकालासाठी संकेतस्थळे
 www.maharesult.nic.in
hscresult.mkcl.org

rediff.com/exams