1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ठाणे , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (10:47 IST)

वसईत पतीकडूनच पत्नीवर अॅसिड हल्ला

वसईमध्ये पतीनेच पत्नीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय राऊत असे आरोपीचे नाव असून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
अजयची पत्नी आरती ही या अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. आरतीवर सध्या वसईच्या सर डी.एम.पेटीट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अजय आणि आरतीचा 17 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर आरतीच्या चारित्र्यावर अजय सातत्याने संशय घेत होता. आरती माहेरी राहात होती. गुरुवारी साडेपाचच्या सुमारास अजयने सासरच्या घरात घुसून आरतीवर अॅसिड हल्ला केला. वसई पो‍लिसांनी अजयला अटक केले आहे.