1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेगवाच्या ‎आनंद सागर‬ची लीज 30 वर्षांकरिता वाढवून मिळाली

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या संस्थेने “तलाव सौदर्यीकरण” या प्रयोजनासाठी विकसीत केलेले “आनंद सागर” ची लीज शासनाने 30 वर्षासाठी वाढवून दिली आहे.
दि. 19 जुलै 2016 रोजी हा निर्णय घेण्यात आला.
 
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेने “आनंद सागर” हा परिसर विकसीत केला आहे, हा परिसर हा अगोदर पडीत होता. याबाबत ग.म. संस्थानाने शासनाकडे मागणी करून या तलावाला विकसीत करण्याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी एक निसर्गरम्य परिसर तयार केला आहे.
 
सन 1999-2000 मध्ये शासनाने ही 101 हे 72 आर पडीत जमीन तलाव सौदर्यीकरणासाठी दिली होती. गेल्या 15 वर्षात श्री गजानन महाराज संस्थानाने या परिसराचा चेहरा मोहरा बदलला असून आज राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु याची लीज संपत आली असल्यामुळे संस्थाने 2012 मध्ये ही लीज वाढवून देण्याबाबत विनंती केली होती. परंतु मागील चार वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबित होते. त्याला आता यश आले आहे.
 
शासनाने एका आदेशाव्दारे उपरोक्त जमिनीची अजून 30 वर्षासाठी लीज मंजूर केली आहे. त्यामुळे आता संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव हे नव्या जोमाने काम करून या आनंद सागर परिसराचे सौदर्यीकरणात भर 
टाकून विदर्भातील लोकासाठी तसेच राज्यभरातील गजानन भक्तांसाठी एक आकर्षक असे पर्यटन स्थळ तयार होईल.
 
साभार- सोशल मीडिया