1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: खालापूर , सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:45 IST)

‘द्रुतगतीवर’ दरड पडण्याची मालिका सुरुच

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटात दरड पडण्याची मालिका सुरुच असून धोकादायक दरड काढण्याचे काम सुरु असताना पुन्हा दरड कोसळल्याने हा प्रवास धोकादायक झाला आहे.

कोसळलेल्या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या घटनास्थळी भेट देऊन उपस्थित तंत्रज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. या वेळी शिंदे यांनी या मागार्ला आता १५ वर्षे झाली असून, येथील पावसाळी वातावरणामुळे दगडांची झीज होऊन ते सुटे झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे दरडी कोसळत असल्याची वस्तुस्थिती असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या संपूर्ण भागाचा भारतीय तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात येत आहे. हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती  शंदे यांनी दिली.