testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कोपर्डी प्रकरण : गुन्हेगारांना झाली अखेर फाशीची शिक्षा

kopardi
Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (11:55 IST)
२०१७ वर्ष हे खऱ्या अर्थाने वादळी ठरले ते कोपर्डी प्रकरण आणि त्यावर झालेली न्यायलयीन सुनावणी न्यायलयाने न्याय करत सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सर्व समाजात स्तरातून याचे स्वागत झाले आणि या प्रकरणात जीव गमवलेल्या बघिनीला थोड्या प्रमाणत का होईना न्याय मिळाला आहे.
मात्र हे प्रकरण काय होते ? काय झाले या वर्षात सविस्तर :
कोपर्डीत गेलो सगळी घटना कळली. दिनांक १३ जुलैच्या संध्याकाळी ७:३० वाजता आपल्या सायकलीवर ३०० मीटरच्या अंतरावर असलेल्या आज्जी-आजोबाच्या घरी काही मसाल्याच सामान आणायला गेली होती ती...त्यांच्या घरापासून २०० मीटरच्या अंतरावर आरोपींचे घरे होती.

मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी मित्राला देत होता. ते मुलीच्या आजोबाच्या घरा शेजारील शेतात दारू पीत होते. त्यांनी या मुलीला सायकलीवर जाताना पाहिले आणि ते तात्काळ तिला सामोरे गेले व बाजूच्या शेतात अतिप्रसंग केला.तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिचे हाल-हाल करून हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात ३ रुमाल लाकडाने कोंबले. तिच्या शरीरातील प्रत्येक भागाचा दाताने लचके काढले. अमानवी कृत्य करण्यामागचा हेतू काय होता ते कळू शकल नाही.
हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी त्या शरीराला (जीवित अथवा मृत) तेथून अंदाजे १५० मीटर दूर असणाऱ्या विहिरीत टाकण्यासाठी नेत होते. परंतु लगतच्या साध्या व छोट्या रस्त्यावरून गाडीवर जात असलेल्या तिच्या मावस भावाला रस्त्यावर मुलीची सायकल व लगतच्या बांधावर काही प्रकार दिसला. तो तिकड गेला असता आरोपी पळाले....मावस भावाला अनपेक्षित प्रकार दिसला.

त्या नंतर तिची body(जिवीत अथवा मृत) कर्जत येथे hospital नेली असता तिथ डॉक्टरांनी मृत घोषीत केल.
फाशीची शिक्षा
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले. गेल्या आठवड्यात या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने या तिघांचा गुन्हा आणि स्वरूप पाहता तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली आहे. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले आहे. खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत.


यावर अधिक वाचा :

चारा घोटळा, चौथ्‍या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

national news
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना चारा ...

स्थूलपणा कमी करणे पडले महागात

national news
नांदेडच्या 33 वर्षीय गौरी अत्रे नावाच्या महिलेने स्थूलपणा कमी करण्यासाठी नॅच्युरोपथीवर ...

राज यांनी दिली ‘मोदीमुक्त’ भारत हाक

national news
देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, ...

रशिया: पुतिन यांचा पुन्हा एकदा विजय

national news
रशियामध्ये विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन ...

भारताने निदाहास चषक जिंकला

national news
भारताने निदाहास चषक जिंकला. श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये कार्तिकने ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

व्हाट्सअॅपवर ग्रुपमधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य

national news
व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. या अपडेटमुळे ग्रुपमधील सदस्याला पर्सनल मेसेज ...