मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

Sarvapitri Amavasya 2019 : या 7 उपायांनी पितरांना मिळेल तृप्ती

28 सप्टेंबर 2019, शनिवारी पितृ मोक्ष अमावस्या आहे. श्राद्ध पक्षात ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे.
 
या दिवशी सर्व ज्ञात-अज्ञात पितरांच्या निमित्ताने श्राद्ध केलं जातं परंतू काही सामान्य उपाय देखील आहे ज्याने आपण आपल्या पितृगणांना संतुष्ट करू शकता.
 
1. पितृ मोक्ष अमावास्येला सकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पितरांच्या निमित्ताने घरात तयार मिठाई व शुद्ध पिण्याच्या पाण्याची कळशी ठेवून धूप-दीप जाळा.
2. पितृ मोक्ष अमावास्येला कुतप-काळात (11.30 मिनिटापासून ते 12.30 मिनिटापर्यंतचा काळ) आपल्या पितरांच्या निमित्ताने गायीला हिरवा पाला खाऊ घाला.
3. पितृ मोक्ष अमावास्येला सकाळी तरपण अवश्य करावे.
4. पितृ मोक्ष अमावास्येला एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणाला कोरडा शिधा अवश्य  द्यावा. 
5. पितृ मोक्ष अमावास्येला आपल्या पितरांच्या निमित्ताने चांदी दान करावी.
6. पितृ मोक्ष अमावास्येला सूर्यास्तानंतर घराच्या गच्चीवर दक्षिणाभिमुख होऊन आपल्या पितरांच्या निमित्ताने तेलाचा चौमुखी दिवा लावावा.
7. पितृ मोक्ष अमावास्येला आपल्या पितरांच्या निमित्ताने गरजू लोकांना यथाशक्ती दान करावे.