testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्राद्ध कसे करावे (पितृपंधरवडा विशेष)

shradha
वेबदुनिया|
श्राद्धाची वेळ 'कुपत' काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च्या आसपास) केले गेले पाहिजे. याचे आमंत्रण आदल्या दिवशी पुरोहिताच्या घरी जाऊन आदराने द्यावे. ब्राह्मणांची संख्या एक, तीन, पाच अशी विषम असावी. प्रथम त्यांना हात, पाय धुवायला पाणी द्यावे. नंतर आचमन करून त्यांना आसनावर बसवून प्रेमाने वाढावे. वाढतांना शांत असावे, रागावू नये. मनात श्रद्धा, विश्वास हवा. जेवणानंतर मुख-शुद्धी तसेच दक्षिणा, वस्त्र, रत्न, या सारखे आपल्या ऐपतीप्रमाणे (यथाशक्ती- दान करावे. ब्राह्मण व आमंत्रितांच्या जेवणानंतर गरीब, तसेच अनाथांनाही संतुष्ट करावे. यामुळे ते यमपुरी (स्वर्गात) जाऊन मृतात्मांची मदत करतात. अनाथाला दिलेले अन्नदान अक्षय होते, असे वराहपुराणात लिहिले आहे. महत्वपूर्ण अशा श्राद्धकर्मात खालील गोष्‍टी महत्वाच्या तसेच पवित्र व पुण्‍यकारक मानल्या गेल्या आहेत, त्या पितरांना अतिशय प्रिय आहेत.
1. 2. कुतप (मुहूर्त) 3. जानवे 4. चांदी 5. पांढरी फुले 6. दक्षिण दिशा.

काळ्या तिळाने युक्त पाण्याने पिंडाची पूजा व त्यावर सिंचन करावे. हे शक्य नसल्यास तिळाने तर्पण करावे (पृथ्वीवर पितरांना पाणी देणे.) असे म्हणतात, की माझ्या कुळात कोणी असा बुद्धीमान माणूस जन्म घेईल जो पैशाच्या मोहाला बळी न पडता आमच्यासाठी पिंडदान करेल. पैसा असताना आमच्यासाठी रत्न, तसेच सर्व योग्य वस्तूंचे दान करेल किंवा अन्न, वस्त्र यासारखे दान श्राद्धकाळात श्रद्धापूर्वक करेल व शांत चित्ताने ब्राह्मणाला यथाशक्ती जेवायला घालेल किंवा अन्नदान करण्यास अमसर्थ असताना फळ, कंदमुळे भाज्या, दक्षिणा देईल व हेही करण्यास असमर्थ असताना हात जोडून एक मूठभर काळे तीळ देईल किंवा आमच्यासाठी पृथ्वीवर श्रद्धापूर्व सात-आठ तिळांनी युक्त पाण्याचे तर्पण वर करून दुपारी आदराने व भक्तीपूर्वक या मंत्राचे उच्चारण करेल.

नमेऽस्ति वित्तं न धनं
न चान्यच्छाध्दस्य योग्यं स्वपितृन्नतोडसि।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतो
भुजौ ततो वर्त्मीन भारुतस्य।

अर्थ : माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पितरांना नमस्कार करतो. ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील. मी आपले हात आकाशाकडे केले आहेत. या प्रकाराने श्राद्ध केल्यास पितर संतुष्ट होऊन कर्त्याला संपूर्ण संमुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.


यावर अधिक वाचा :

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

national news
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...

मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी

national news
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा ...

साईबाबांनी दसर्‍याला का घेतली समाधी ?

national news
साईबाबांच्या दसर्‍याला समाधी घेण्यामागे काय रहस्य आहे? यापूर्वी त्यांनी रामविजय प्रकरण का ...

अजून वेळ गेलेली नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय

national news
नवरात्रीच्या 9 दिवस भक्त कठिण आणि विशेष उपासना करतात. परंतू अनेकदा विधी विधान पूर्वक पूजा ...

राशिभविष्य