शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : सोमवार, 27 जुलै 2020 (08:47 IST)

श्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, जाणून घ्या हे 5 गुपित....

श्रावण महिन्यातील पाच सोमवार हे शिवाच्या 5चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहेत. चला जाणून घेऊ या संदर्भात मनोरंजक माहिती.
 
महादेवाचे 5 चेहरे हे पंचमहाभूतांचे सूचक आहेत. दहा हात हे 10 दिशांचे सूचक आहे. हातात असलेले अस्त्र-शस्त्र जगाची राखण करणाऱ्या शक्तींचे सूचक आहेत.
 
1. श्रावण महिन्यात महादेवाच्या 5 चेहऱ्यांचे महत्त्व आहे. अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की सृष्टी, स्थिती, लय, कृपा आणि ज्ञान या 5 कार्यांची निर्मिती करणारे 5 शक्तींचे संकेत म्हणजेच शिवाचे हे 5 चेहरे आहेत. पूर्वेकडील चेहरा सृष्टी, दक्षिणे कडील चेहरा स्थिती, पश्चिमेकडील चेहरा प्रलय, उत्तरेकडील चेहरा कृपा आणि ऊर्ध्व मुख ज्ञानाचे सूचक आहे.
 
2. भगवान शंकराच्या 5 चेहऱ्यांमध्ये ऊर्ध्व(वरील चेहरा), दुधाचा रंगाचा, पूर्वीकडील चेहरा पिवळ्या रंगाचा, दक्षिणेचा चेहरा निळ्यारंगाचा, पश्चिमी चेहरा पांढऱ्या रंगाचा आणि उत्तरीय चेहरा कृष्णवर्णाचे आहे. भगवान शिवाचे पाच ही चेहरे चारही दिशांमध्ये आणि पाचवा मध्यात आहे. शिवाच्या पश्चिमेकडील चेहरा निरागस मुलासारखा स्वच्छ, शुद्ध आणि निर्विकार आहे. उत्तरेच्या दिशेला असलेला चेहरा वामदेव म्हणजेच सर्व विकार सर्व कष्टांना दूर करणारे आहेत. दक्षिणेला असणारा चेहरा अघोर म्हणजे निंदनीय काम करणारा. निंदनीय किंवा अघोरी काम करणारा देखील शिवकृपेमुळे निंदनीय कामाला देखील शुद्ध करून घेत. शिवाचं पूर्वीकडे असलेल्या चेहऱ्याला तत्पुरुष म्हणतात म्हणजे आपल्याच आत्मेमध्ये टिकून राहणं. उर्ध्वी कडील चेहऱ्याला ईशान म्हणजे जगाचा स्वामी असे म्हटले जाते. 
 
3. शिव पुराणात भगवान शिव म्हणतात - सृष्टी, पालन, संहार, विलुप्ती आणि कृपा- हे पाच कार्ये माझ्या पाचही चेहऱ्यावर अवलंबून आहेत.
 
4. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी एकदा सुंदर असे किशोरवयीन रूप घेतले होते. त्यांचे हे सुंदर रूप बघण्यासाठी चतुर्भुजी ब्रह्मा, बहुमुखी शेष, सहस्त्राक्ष चेहऱ्याचे इंद्र आणि इतर देव आले. सर्वांनी विष्णूंच्या या रूपाचे आनंद घेतले, भगवान शंकर विचार करू लागले की जर मला देखील जास्त चेहरे असते तर तर मी देखील अनेको डोळ्यानं भगवान विष्णूंच्या या किशोर रूपाचे जास्त दर्शन केले असते. कैलासपतीच्या मनातही इच्छा जागृत होतातच ते पंचमुखी झाले.
 
5. भगवान शिवाचे हे पाच चेहरे सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान असे होते. प्रत्येक चेहऱ्याला तीन-तीन डोळे होते. तेव्हापासूनच ते 'पंचानन' किंवा 'पंचवक्त्र' म्हटले जाऊ लागले. भगवान शिवाच्या या पंचमुखी अवताराची कथेचे वाचन करणे किंवा ऐकण्याचं फार महत्त्व आहे. हे माणसामध्ये शिव-भक्ती जागृत करण्याबरोबरच त्यांची सर्व इच्छा पूर्ण करून परम गती देतात.