मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By

यामुळे श्रीदेवी जवळ आली बोनीच्या...

सोलहवां सावन चित्रपट पाहून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात असे पडले की तिचा विसरच पडत नव्हता. तिला भेटण्यासाठी बोनी चेन्नईलासुद्धा गेले होते. पण श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने भेट होऊ शकली नाही. निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार हे बोनीने ठरवून घेतले होते. तेव्हा श्रीदेवीचे काम त्यांची आई पाहत होती.
 
फोनवर आईने दोघांना वाट बघायला सांगितले परंतू 3 ते 4 दिवस फोन आलाच नाही. बोनी काळजीत होते आणि रोज श्रीदेवीच्या बंगल्याचे चक्कर लावायचे. 10 दिवसाने आईला भेटल्यावर त्या म्हणाल्या की श्रीदेवी मिस्टर इंडिया या सिनेमात काम करेल परंतू तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली. त्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. त्या दरम्यान त्या चांदनी सिनेमासाठी शूट करत होत्या आणि बोनी बहाण्याने स्विट्जरलैंड पोहचून जायचे ज्याने श्रीदेवीची भेट घडावी.
 
श्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरीला महत्त्वाचे वळण आले. तिच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान श्रीदेवीला मानसिक, भावनिक आणि आर्थिक रुपात मदत दिली ती बोनी कपूर यांनी. तिच्या आईचे कर्जसुद्धा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांचे प्रेम आणि समर्पण बघून खूप प्रभावित झाली आणि अखेर बोनीच्या प्रेमाला होकार दिला. 1996 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि त्यांना जान्हवी व खुशी या दोन मुली आहेत.