testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 8 (पुष्पवती)

simhasan battisi
वेबदुनिया|
WD
पुष्पवती कथा सांगू लागली...
कलेचा पुजारी होता. तसेच कलाकारांची कदर करणाराही होता. त्यांनी विविध कला प्रकारांनी आपला महल सजावला होता. एकदा एक व्यक्ती दरबारात दाखल झाला. त्याच्याकडे एक लाकडाचा घोडा होता. त्याने तो राजाला विकण्याचे ठरविले होते. लाकडी घोडा आकर्षक होता. राजा विक्रमाला घोडा पाहता क्षणी आवडला होता. तो घोडा चमत्कारी असून पाणी, जमीन व आकाशात तीव्र गतीने धावतो, असा त्या व्यक्तीने दावा केला होता.
राजा विक्रमने त्या घोड्‍याच्या बदल्यात त्याच्या मालकाला एक लाख सूवर्ण मोहरा देऊन त्याला रवाना केले. एके दिवशी राजाने तो घोडा घेऊन जंगलात शिकार करण्‍यासाठी निघून गेला. मात्र राजाने त्या घोड्याची गती इतकी वाढविली की, राजा आपल्या सहकार्‍यापासून फार पुढे निघून आला होता.

राजाच्या तो नियंत्रणाबाहेर झाल्याचे पाहून त्याने तो जमिनीवर उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु घोडा एका झाडाला धडकला व त्याचे तुकडे तुकडे होऊन गेले. राजा एकटात जंगलात हिंडत होता. तेवढ्यात एक माकडीन राजाला हावभाव करून काही सांगण्याचा प्रयत्न करू करत होती. मात्र राजाने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. राजाला भूख लागली होती. एका झाडाला लागलेले फळ खाऊन त्याने क्षुधा शांत केली. एका झाडावर चढला वर आराम करू लागला. तितक्यात तेथे एक योगी आला. त्याने इशार्‍याने माकडीनीला बोलावले. शेजारी असलेल्या झोपडीत दोन राजणाजवळ बसविले. त्याने एका राजणातील थोडे पाणी काढून माकडीनीवर टाकले. माकडीनी एक रुपवती राजकुमारी बनून गेली. तिने त्या योग्यासाठी स्वयंपाक केला. जेवण झाल्यानंतर योगी झोपून गेला. सकाळ होताच दूसर्‍या राजंणातील पाणी काढून राजकुमारीवर टाकून राजकुमारी पुन्हा माकडीनीत रूपातंर झाले.
राजा विक्रम हा सारा प्रकार पाहत होता. योगी जाताच राजा झाडावरून खाली उतरला. माकडीनीला घेऊन राजा विक्रम झोपडीत शिरला. त्याने पहिल्या रांजणातील थोडे पाणी काढून माकडीनीवर टाकताच ती एक लावण्यवती राजकुमारी बनली. त‍ी कामदेव व अप्सराची कन्या असल्याचे तिने राजाला सांगितले. ती शिकार करत असताना मृगाकडे सोडलेला बाण एका साधुला लागला व त्याने शाप दिला. तेव्हापासून माकडीन होऊन त्या योग्याची सेवा करावी लागत आहे. असे तिने राजाला सांगितले. तेव्हा राजाने तिला साधुच्या शापातून मुक्त केले. त्याबदल्यात राजकुमारीने राजाला कमळाचे फूल प्रदान केले.
तत्पश्चात विक्रमाने देवदत्त दोन वेताळांना बोलावले. त्यांनी राजाला राजधानीत आणून सोडले. मात्र एक मुलाने राजाला ते कमळाचे फूल मागितले. विक्रमने कुठलाही संकोच न करता ते मुलाला देऊन टाकले व महात निघून गेला. काही दिवस गेल्या नंतर दरबारात एका व्यक्तीला पकडून आणण्यात आले. मुल्यवान रत्न विकताना त्याला शिपायांनी पकडले होते. हे किमंती रत्ने कोठून आणले असे विचारले असता, त्याच्या मुलाला कोणी एक कमळाचे फुल दिले होते. त्यातून हे रत्न पडतात असे त्यांने राजाला सांगितले. राजाने ते रत्ने खरेदी करून त्या व्यक्तीला खूप रूपये देऊन रवाना केले.


यावर अधिक वाचा :

उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या ...

national news
पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ...

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...