मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सिडनी , सोमवार, 28 जानेवारी 2019 (10:26 IST)

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा : जोकोविचला जेतेपद; नदालचा पराभव

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचने राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. 6-3, 6-2, 6-3 अशा फरकाने जोकोविचने नदालचा पराभव केला. या जेतेपदासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि रॉय इर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्र केला आहे.
 
जोकोविचने रविवारी झालेल्या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. नदालचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत सामना 3-0 च्या फरकाने जिंकला. तिन्ही सेटमध्ये नदालला एकही संधी दिली नाही. पहिला सेट 6-3 च्या फरकाने जिंकत जोकोविचने वेगवान सुरूवात केली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात नदालला एकदाही संधी न देता सामन्यावर नाव कोरले.