मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 8 जुलै 2021 (18:39 IST)

इटलीविरुध्द स्पेन सामना पाहायला पोहोचले बुमराह व संजना

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरूध्द सुरू होणार्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी दिली आहे आणि त्या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करत आहेत.
 
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी व टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन हे युरो स्पर्धेतील इटलीविरुध्द स्पेन हा उपान्त्य फेरीचा सामना पाहायला वेम्बली स्टेडियमवर पोहोचले होते. संजनाने सोशल मीडिावर दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.