1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 मार्च 2018 (09:11 IST)

जागतिक फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धासाठी भारतीय संघ रवाना

indian fencing team
इपी इपी सँटेलाईट जागतिक फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धासाठी भारतीय संघ मुंबईहून रवाना झाला. फिनलैन्ड येथे १८ ते २० मार्च २०१८ च्या दरम्यान संपन्न होणार आहे. याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्युट पुणे येथे सुरु होते शिबिरातून अंतिम निवड करण्यात आली.यावेळी  संघात अजिंक्य दुधारे हा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे. तो सध्या धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.

निवड समिती सदस्य म्हणून डॉ. उदय डोंगरे (महाराष्ट्र), कर्नल विक्रम जांबवाल (आर्मी) रणजितसिंग (मणिपूर) यांनी काम पहिले. भारतीय संघाची घोषणा भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता (उत्तराखंड) सचिव राजीव मेहता (छत्तीसगड) खजिनदार अशोक दुधारे (महाराष्ट्र), यांनी केली असून संघास शुभेच्छा दिल्या आहेत.

पुरुष संघ : अजिंक्य दुधारे (महाराष्ट्र), सुनिल कुमार जाखड (राजस्थान), पंकजकुमार शर्मा (जम्मू काश्मीर),  एन. संतोष (आर्मी).