Widgets Magazine
Widgets Magazine

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा : ‘ग्रॅंड डबल’साठी मो. फराह सज्ज

लंडन, शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:50 IST)

mohammad farah

इंग्लंडचा महान धावपटू मो फराहने याआधीच 10 हजार मीटरचे सुवर्णपदक पटकावून आपल्या जागतिक सुवर्णांची संख्या 10वर नेली आहे. परंतु तेवढ्यावर आपण समाधान मानणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. त्याची आजची धावही हा दावा खरा ठरविण्यासाठी आश्‍वासक होती. पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीच्या हीट्‌समध्ये मो फराहने आपल्या नेहमीच्या सहजतेने धाव घेतली. आश्‍चर्यकारकरीत्या तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. परंतु त्याला त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागले नाहीत. इथिओपियाच्या योमिफ केदेलजाने पहिल्या क्रमांकाने अंतिम रेषा ओलांडली. आता तमाम क्रीडारसिकांना मो फराहच्या 11व्या सुवर्णपदकाची प्रतीक्षा आहे. स्वत: फराहने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. उसेन बोल्टचे काय झाले ते विसरू नका, असे सांगून तो म्हणाला की, तुम्ही कोणीही असलात तरी तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला कोणतेही यश सहजासहजी मिळू देणार नाहीत. ते सर्वजण मला पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. त्यामुळे वाट पाहा, इतकेच मी सांगेन.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

एका परदेशी खेळाडूने गोंदवले हिंदी भाषेत टॅटू

आपल्या शरीरावर हिंदी भाषेत टॅटू काढणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूचे ...

news

सायना, सिंधू यांना पहिल्या फेरीत बाय

येत्या 21 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. ...

news

युकी भांब्रीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानी असलेल्या भारताच्या टेनिसपटू युकी भांब्रीने सिटी ओपन टेनिस ...

news

नेयमारची बार्सिलोनामधून विदाई

लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार या बार्सिलोना क्लबच्या प्रमुख आक्रमणपटूंची फळी ...

Widgets Magazine