शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (10:07 IST)

मोदी सरकारची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, काय आहे खास जाणून घ्या

मोदी सरकार ने कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळावे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली. 
 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी आत्मनिर्भर पॅकेज 3.0 जाहीर करताना सांगितले की गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान रोजगार संवर्धन योजना सुरू करण्यात आली होती आणि आता ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा त्यांना मिळणार आहे ज्यांचे काम कोरोना कालावधीत गेले आहेत.
 
या योजनेचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत लोकांना मिळणार. ही योजना 30 जून 2021 पर्यंत चालणार आहेत.
 
 ते म्हणाले, की या अंतर्गत अशा लोकांना फायदा होणार आहेत ज्यांचे पगार दरमहा 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी आहेत आणि ती व्यक्ती ई पीएफओ मध्ये नोंदणीकृत आहे.
 
या अंतर्गत एक हजार पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि मालकांना दोघांच्या ईपीएफओ चा 24 टक्के हिस्सा सरकार देणार, जे दोन वर्षासाठी असेल. 
 
एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थांमध्ये ईपीएफओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाटांपैकी 12 टक्के सरकार योगदान देणार.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 कर्मचारी असलेल्या संस्थाना आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी दोन नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार, तर ज्या संस्थांमध्ये 50 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्यांना किमान 5 कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार.