रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (16:01 IST)

चॉकलेट डे स्पेशल कविता

चॉकलेटच आकर्षण होतं बालपणी,
दिसताच चॉकलेट, तोंडाला येतं असे पाणी,
रावळगाव चॉकलेट आई देत असे,
आमची स्वारी त्यातही खुश होत असे,
आता तर बुवा हा चॉकलेट डे आला,
व्हॅलेंटाईन विक मधला एक दिवस भला,
देतील लोकं एकमेकांना चॉकलेट गोडीन,
अनमोल आम्हास जे आम्ही खात असू आवडीनं,
महिमा त्याचा असा की रडतं मूल लागे हसू,
वाढदिवसाला आम्ही शाळेत वाटत असू,
करा तुम्ही प्रेमभरे दिवस साजरा कसाही,
आम्ही आपले रमू लहानपणात आजही!!
अश्विनी थत्ते.