बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (17:49 IST)

व्हॅलेंटाईन डे 2021 : घरीच व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी अशी सजावट करा

शतकानुशतके प्रेमाचे एक वेगळेच स्थान आहे,आणि फेब्रुवारी महिना तर प्रेमी लोकांसाठी खूपच खास आहे कारण हा संपूर्ण आठवडा प्रेमाच्या रूपात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन दिवसाची गोष्ट करा तर या दिवशी काही लोक आपल्या जोडीदाराला घरातच अनेक प्रकारे सरप्राइज देण्याची योजना आखतात. या साठी घराला चांगले सजवतात.परंतु बऱ्याच वेळेला काही नकाही कमतरता राहतेच, या मुळे आपण आणि जोडीदाराला निराश होतात.परंतु  घाबरून जाऊ नका आज सांगत आहोत घराच्या सजावटीच्या काही खास पद्धती ज्यांना अवलंबवून आपण आपले व्हॅलेंटाईन डे आपल्या जोडीदारासह चांगल्या पद्धतीने साजरे करू शकाल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
* लाल फुगे लावून घराला रोमँटिक लुक द्या-
प्रत्येक जण आपल्या व्हॅलेंटाईन दिवसाला खास बनविण्याचा प्रयत्न करतो. या साठी आपल्याला घराची सजावट रोमँटिक लुक मध्ये करावयाची आहे.या साठी आपण लाल रंगाच्या बदामाच्या आकाराच्या फुगांचा वापर करू शकता. भिंती पासून जमिनीपर्यंत आपण हे फुगे लावू शकता.तसेच लाल रंगाच्या फुलांनी घराला सजवू शकता.लाल रंगाचे रिबिन लावून देखील घराच्या भितींना सजवू शकता. तसेच पलंगाच्या भोवती देखील लाल फुगे लावू शकता आणि खोलीत फिकट लाल रंगाचे दिवे लावू शकता.
 
* कँडल लाइट डिनर ने जोडीदाराला आनंदी करा-
आपण आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन च्या दिवशी घरातच काही सरप्राइज देऊ इच्छिता, तर या साठी आपण एक विशेष कँडल लाइट डिनर टेबल देखील सजवू शकता.या साठी आपण कँडल, फुले आणि चॉकलेट सजावटीसाठी वापरू शकता. तसेच हृदयाच्या आकाराचा केक देखील आणू शकता, ज्याच्या वर व्हॅलेंटाईन डे लिहिले आहे. 
 
* मेणबत्त्या मदत करतील-
जेव्हा घरात शिरतो तेव्हाच घरात दृष्टी पडण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत सजावट घराच्या दारापासून करण्यासाठी मेणबत्ती मदत करू शकते. दाराच्या बाजूने आणि रस्त्याच्या मध्ये आपण मेणबत्त्या पेटवू शकता. आपण असं देखील करू शकता की घराच्या दारापासून मेणबत्त्या पेटवून एक मार्ग बनवू शकता, आणि हा मार्ग ज्या ठिकाणी आपण जोडीदारासाठी काही भेटवस्तू ठेवले आहे तिथवर पर्यंत तयार केलेला असावा.असं केल्यानं आपला जोडीदार आनंदी होऊ शकतो आणि आपला हा दिवस खूप चांगला असू शकतो.
 
* प्रत्येक कोपरा उजळवा-
 व्हॅलेंटाईन डे च्या खास प्रसंगी आपण आपल्या घराचा काना कोपरा देखील उजळवू शकता. या साठी आपल्याला घरातील रिकाम्या बाटल्या घेऊन त्यामध्ये दिवे लावायचे आहे आणि या बाटल्या बैठकीच्या खोलीत कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. ह्याचा प्रकाश खूपच देखणा असतो. जर आपल्याकडे एवढे दिवे नसल्यास आपण या साठी मेणबत्त्या देखील वापरू शकता. जेणे करून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उजेड पडावा आणि घराचे सौंदर्य उजळेल.