testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आईसोबत योगा करणारी 4 वर्षाची ही चिमुरडी

yoga
Last Modified मंगळवार, 23 डिसेंबर 2014 (15:53 IST)
चार वर्षाची मिनी, कधी आईच्या हातांना आपल्या चिमुकल्या हातांमध्ये उचलते, कधी स्वत:च्याच हातावर उभी होते, तर कधी डोक्यावर उभ्या झालेल्या आपल्या आईच्या पायांवर बसते. बघताना ही कसरत वाटेल, मात्र खरं तर हा योगाचा एक भाग आहे. न्यू जर्सीची रहिवाशी असलेली चार वर्षाची ही मिनी आपली आई लौरासोबत योगा करताना हटके पोज देते. तिच्या या पोज बघून बघणारे नक्कीच अचंबित होतात.

मिनीची आई आणि योगा एक्सपर्ट लौरा केसपरजक यांनी सांगितले, ‘माझी चार वर्षाची मुलगी मिनीला माझ्याप्रमाणेच योगात रुची असल्याचे हळूहळू माझ्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही दोघींनी एकत्र योगा करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने माझ्यासारख्या पोज दिल्या. मिनी कॅमेर्‍यासमोर उत्कृष्ट योगा करते. तिची योगा करतानाची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली असून आतापर्यंत लाखो लोकांनी ती पाहिली आहेत.’

लौरा मागील 17 वर्षापासून योगा क्लासेस घेत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चार वर्षाची मिनी योगात पारंगत झाली आहे. मुलगा अद्याप लहान आहे, मात्र तोसुदधा योगाची पोज देतो.


यावर अधिक वाचा :

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...