शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

प्रेम'योग'

WD
प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात मतभेदाला सुरवात झाले की त्यांच्यातले प्रेम आटू लागते आणि नाते तुटू लागते. आयुष्यात प्रेम उरलेच नाही की मग वैचारिक भग्नता येते. पण हे भग्न ह्रदय जोडण्याची ताकद योगामध्ये आहे. आश्चर्य वाटेल, पण योग तुमच्या प्रेमातही उपयोगी ठरू शकतो. कारण योग या शब्दाचा अर्थच जोडणे असा आहे. प्रेम हे दोन जीवांना जोडत असते. सहाजिकच योगाचा अंगीकार प्रेमातही लाभदायी ठरू शकतो.

योगाच्या शक्तीमुळे तुम्ही संपूर्ण नवीन जग तयार करू शकता. या नवीन जगात प्रेमाशिवाय काहीच असू शकत नाही. योग तुमच्यातील अहंकाराचा नाश करुन त्याचे रुपांतर समर्पण वृत्तीत करते. त्यामुळे तुमच्याकडून चुका होत नाहीत. तसेच तुमच्या जीवनसाथीकडून होणार्‍या चुकाही माफ करण्याची क्षमता तुमच्यात येते. योगातील प्रथम अंग यम असून त्याचे पहिले सूत्रच 'सत्य' आहे. खरे बोलण्यामुळेच प्रेम वाढते. वागणे, बोलणे आणि तसा व्यवहार करणे ही खरे बोलण्याची शक्तीस्थळे आहेत. दुसरे सूत्र अनासक्ती आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्ती, वस्तूबाबत मोह ठेवू नये. मोह आणि प्रेमात फरक आहे. प्रेम स्वातंत्र्य देते, परंतु, मोह अप्रत्यक्ष गुलामी आहे. मोहापासूनच दु:खाची सुरवात होते. शरीर आणि मनाची पवित्रता ठेवणे हे तिसरे सूत्र आहे. यामुळे तुमच्या सहकार्‍यांचा विश्वास तुम्हाला नेहमी मिळेल. प्रेमात पावित्र्याचे खूपच महत्व आहे.

प्राणायाम : प्राणायाम आपल्या शरीर, मन आणि डोक्याला शांत ठेवतो. व्यक्तीमत्व प्रेमपूर्ण बनण्यासाठी प्राणायामाचे महत्व खूप आहे. दोघांची मने जोडण्यासाठी प्राणायमही केला तरी खूप आहे.